एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.
एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही......
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमालढ्याच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मराठी भाषिकांच्या या पराभवाने कोणाला उकळ्या फुटायच्या त्या फुटोत, सीमाप्रश्नाच्या लढ्याचे सळसळते हात साखळदंडाच्या जोखडात करकचून बांधले गेले, लढा आणखी चार दशके मागे गेला, मराठी अस्मितांच्या ज्वालांवर फंदफितुरीने पाणी ओतलं गेलं. त्याचं आता काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे......
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध......
उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील.
उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील......
सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.
सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी......
एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय.
एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय......
उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का? या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का?
उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का? या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का?.....