गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं.
गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या 'री-शेपिंग आर्ट' या पुस्तकाची सगळीकडे चर्चा झाली. या पुस्तकाचा 'कलेची पुनर्घडण' या नावाने मराठी अनुवादही आलाय. कला म्हणजे काय? कला आणि समाज यांचं नातं, कलेचं काळानुरूप बदलणं अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचवेळी या क्षेत्रातल्या सनातनी प्रवृत्तीलाही आरसा दाखवतं......
हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे.
हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाचा विजेता म्हणून अल्ताफ शेख म्हणजेच एमसी स्टॅनची निवड झालीय. ज्या पुण्याला ‘सांस्कृतिक शहर’ म्हणत निव्वळ एका विशिष्ट संस्कृतीचा उदोउदो केला जातो, त्याच पुण्याच्या गल्लीबोळात गेली काही वर्षं जागतिक दर्जाची रॅप संस्कृती जोम धरू पाहतेय. एमसी स्टॅन हा याच नव्या संस्कृतीचा एक खंदा शिलेदार आहे......
भजन-किर्तनात न रमणाऱ्या तरुणाईला धार्मिक उपदेश करायचा तर त्यासाठी तरुणाईला जवळची वाटतील अशीच साधनं निवडली जायला हवीत. याच विचारातून उत्तर प्रदेशमधे हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला आलंय. धार्मिक उपदेशापेक्षा धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणाऱ्या या संगीतविश्वाचं अंतरंग उलगडणारी डॉक्युमेंटरी डीडब्ल्यू या जर्मन न्यूज एजन्सीनं प्रसारित केलीय.
भजन-किर्तनात न रमणाऱ्या तरुणाईला धार्मिक उपदेश करायचा तर त्यासाठी तरुणाईला जवळची वाटतील अशीच साधनं निवडली जायला हवीत. याच विचारातून उत्तर प्रदेशमधे हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला आलंय. धार्मिक उपदेशापेक्षा धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणाऱ्या या संगीतविश्वाचं अंतरंग उलगडणारी डॉक्युमेंटरी डीडब्ल्यू या जर्मन न्यूज एजन्सीनं प्रसारित केलीय......
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय.
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय......
भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय.
भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय......
लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत.
लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत......
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......
औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग.
औसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग......
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.
२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......
प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?
प्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी?.....
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय......
सध्या लॉकडाऊन सुरूय. घरी बसल्याबसल्या आपल्याला काही लिहावंसं वाटतं. ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडिया आहेच. पण त्या पलीकडच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सुजाण वाचकांपर्यंत पोचायची इच्छा असेल, तर आपलं कोलाज आहे. कोलाजचे वाचक शुभम टाके यांनी किशोरी आमोणकरांवर लिहिलेला लेख आज कोलाजवर प्रकाशित करतोय. इच्छा असेल तर तुम्हीही तुमचा लेख kolaj.marathi@gmail.com वर पाठवू शकता. – संपादक
सध्या लॉकडाऊन सुरूय. घरी बसल्याबसल्या आपल्याला काही लिहावंसं वाटतं. ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडिया आहेच. पण त्या पलीकडच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सुजाण वाचकांपर्यंत पोचायची इच्छा असेल, तर आपलं कोलाज आहे. कोलाजचे वाचक शुभम टाके यांनी किशोरी आमोणकरांवर लिहिलेला लेख आज कोलाजवर प्रकाशित करतोय. इच्छा असेल तर तुम्हीही तुमचा लेख kolaj.marathi@gmail.com वर पाठवू शकता. – संपादक.....
संगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात.
संगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात......
मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती.
मोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती. .....