आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.
आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे......