'मी रांगेतच उभा आहे' हा कवी भूषण रामटेके यांचा कवितासंग्रह. वर्षानुवर्ष गरिबीच्या काळोखात आयुष्य रेटत असलेल्या आणि आजही अच्छे दिन येतील अशी भाबडी आशा असणाऱ्या समूहाचं दुःख रामटेके यांनी यात मांडलंय. दलित, वंचित, शोषित, आदिवासी समूहांच्या वास्तववादी दुःखाला त्यांनी या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडलीय.
'मी रांगेतच उभा आहे' हा कवी भूषण रामटेके यांचा कवितासंग्रह. वर्षानुवर्ष गरिबीच्या काळोखात आयुष्य रेटत असलेल्या आणि आजही अच्छे दिन येतील अशी भाबडी आशा असणाऱ्या समूहाचं दुःख रामटेके यांनी यात मांडलंय. दलित, वंचित, शोषित, आदिवासी समूहांच्या वास्तववादी दुःखाला त्यांनी या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडलीय......
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते.
'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते......
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज.
कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा तुला प्रकाशनाने 'कोलाहल' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. गुर्जर हे साठनंतरच्या पिढीतले एक लोकविलक्षण कवी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी लघुनियतकालिक परंपरेतल्या कवितेनं अभिव्यक्तीचं विमुक्त उधाण आणलं होतं. याच परंपरेतल्या एका महत्त्वाच्या कवीचा हा दस्ताऐवज......
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत.
कवी श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा कवितासंग्रह. त्यांच्या कवितांकडे पाहिलं तर या कविता विसंगत अनुभूतीला पकडणार्या आणि सामाजिक भान जपणार्या आहेत. तसंच नात्यांना कवेत घेणार्या आणि जगण्याच्या लढाईत नेकीची सोबत करणार्या आहेत. म्हणूनच महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्या आतून आलेल्या आहेत. .....