दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय......
भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमधे निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या एण्ट्रीनं काँग्रेसचं टेंशन वाढवलंय. त्यामुळे मोदी-शहांच्या कर्मभूमी गुजरातमधे यंदा महागाई, बेकारी हे मुद्दे चालणार की, हिंदुत्वाचं मॉडेल भाजपला तारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.
भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमधे निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या एण्ट्रीनं काँग्रेसचं टेंशन वाढवलंय. त्यामुळे मोदी-शहांच्या कर्मभूमी गुजरातमधे यंदा महागाई, बेकारी हे मुद्दे चालणार की, हिंदुत्वाचं मॉडेल भाजपला तारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय......
गंगेच्या काठावर वसलेल्या गोऱ्या रंगाच्या आर्यांनी मांडलेला धर्म तेवढाच हिंदू धर्म नाही. तसंच संस्कृतमधून लिहिल्या गेलेल्या वेद-पुराणासारख्या ब्राह्मणांच्या ग्रंथात मांडलेला धर्म म्हणजेच हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा त्यापलिकडं असून, त्याचं नितांतसुंदर दर्शन 'कांतारा' या सिनेमामधून होतं, असं मत पुराणकथांचे अभ्यासक आणि मॅनेजमेंट गुरू देवदत्त पट्टनाईक यांनी मांडलंय.
गंगेच्या काठावर वसलेल्या गोऱ्या रंगाच्या आर्यांनी मांडलेला धर्म तेवढाच हिंदू धर्म नाही. तसंच संस्कृतमधून लिहिल्या गेलेल्या वेद-पुराणासारख्या ब्राह्मणांच्या ग्रंथात मांडलेला धर्म म्हणजेच हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म हा त्यापलिकडं असून, त्याचं नितांतसुंदर दर्शन 'कांतारा' या सिनेमामधून होतं, असं मत पुराणकथांचे अभ्यासक आणि मॅनेजमेंट गुरू देवदत्त पट्टनाईक यांनी मांडलंय......
दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते.
दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते......
मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना, अनेक माध्यमांनी ‘पत्नीने मंगळसूत्र न घालणं ही क्रूरता,’ असं न्यायालयाने म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचं, प्रतीकांचं प्रचंड अवडंबर माजवलंय.
मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना, अनेक माध्यमांनी ‘पत्नीने मंगळसूत्र न घालणं ही क्रूरता,’ असं न्यायालयाने म्हटलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचं, प्रतीकांचं प्रचंड अवडंबर माजवलंय......
आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं.
आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं......
हिंदुत्ववादी विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश इथं देत आहोत.
हिंदुत्ववादी विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश इथं देत आहोत......
देशात हिंदू बहुसंख्य आहेत, यात वादच नाही. पण ज्या ठिकाणी ते धर्म किंवा भाषेच्या निकषानुसार अल्पसंख्य आहेत, तिथं त्यांची ससेहोलपट होता कामा नये. भाजप नेते आणि प्रसिद्ध वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी या विषयाला वाचा फोडताना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. प्रत्यक्षातलं चित्र याच्या विरुद्ध आहे. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे मतप्रदर्शन किंवा आदेश क्रांतिकारी ठरणार आहे.
देशात हिंदू बहुसंख्य आहेत, यात वादच नाही. पण ज्या ठिकाणी ते धर्म किंवा भाषेच्या निकषानुसार अल्पसंख्य आहेत, तिथं त्यांची ससेहोलपट होता कामा नये. भाजप नेते आणि प्रसिद्ध वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी या विषयाला वाचा फोडताना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. प्रत्यक्षातलं चित्र याच्या विरुद्ध आहे. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे मतप्रदर्शन किंवा आदेश क्रांतिकारी ठरणार आहे......
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो.
आज शिवजयंती. शिवचरित्रातल्या नाट्यमय घटना स्वराज्यनिर्मितीची साधनं असतात. ते साध्य नाही. म्हणूनच त्यांच्या हिंदवी स्वराज्याची साध्यं म्हणजेच अधिष्ठानं कोणती होती, ते पहायला हवं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला निश्चित अशा प्रकारचं अधिष्ठान होतं. त्याशिवाय ते पवित्र कार्य आकाराला येऊ शकलं नसतं. त्यांच्या या अधिष्ठानाचा मागोवा शिवकालीन पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रातून घ्यावा लागतो......
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.
धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे......
कंटेंटच्या नावाखाली शिवीगाळ करणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’ला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली. मुंबईत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न ‘हिंदुस्तानी भाऊ’ने केला होता. स्वतःला ‘सोशल मीडिया इंफ्लुएंसर’ म्हणवणारे हे लोक आजच्या तरुणाईचा आदर्श ठरू पाहतायत.
कंटेंटच्या नावाखाली शिवीगाळ करणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’ला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली. मुंबईत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न ‘हिंदुस्तानी भाऊ’ने केला होता. स्वतःला ‘सोशल मीडिया इंफ्लुएंसर’ म्हणवणारे हे लोक आजच्या तरुणाईचा आदर्श ठरू पाहतायत......
भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात.
भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात......
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. राजकीय फायद्यासाठी छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा संबंध जोडण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. महापुरुषांच्या नावाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजायची ही सवय महाराष्ट्राला नवी नाही. पण छत्रपती शिवराय आणि त्यांचा हिंदू धर्म आपल्याला जे सांगू पाहतोय ते फार वेगळं आहे......
भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत.
भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत......
कुंभमेळ्यासाठी ७० लाख जण हरिद्वारला गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यापैकी अनेकजण कोरोना घेऊन गावोगावी मरण भोगत आहेत, पसरवत आहेत. हे सारं धर्माच्या खोट्या कल्पनांमुळे झालंय. खरा धर्म तर वारीचा आहे. माणुसकीचा आहे. `वारी चुको नेदी हरी`, असं वारकरी विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला.
कुंभमेळ्यासाठी ७० लाख जण हरिद्वारला गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यापैकी अनेकजण कोरोना घेऊन गावोगावी मरण भोगत आहेत, पसरवत आहेत. हे सारं धर्माच्या खोट्या कल्पनांमुळे झालंय. खरा धर्म तर वारीचा आहे. माणुसकीचा आहे. `वारी चुको नेदी हरी`, असं वारकरी विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला......
आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक.
आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक......
नेपाळमधे राजकीय पेच निर्माण झालाय. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाची संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मान्य केलीय. सार्वत्रिक निवडणुकीनंतर अवघ्या ३ वर्षातच संसद बरखास्त करण्यात आलीय. लगोलग मध्यावधी निवडणुकांची घोषणाही करण्यात आली. हा निर्णय संविधान विरोधी असल्याचं म्हटलं जातंय. मुळात सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ' मधला हा अंतर्गत संघर्ष असला तरी त्याला आंतराष्ट्रीय राजकारणाचे अनेक कंगोरेही आहेत.
नेपाळमधे राजकीय पेच निर्माण झालाय. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाची संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मान्य केलीय. सार्वत्रिक निवडणुकीनंतर अवघ्या ३ वर्षातच संसद बरखास्त करण्यात आलीय. लगोलग मध्यावधी निवडणुकांची घोषणाही करण्यात आली. हा निर्णय संविधान विरोधी असल्याचं म्हटलं जातंय. मुळात सत्ताधारी 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ' मधला हा अंतर्गत संघर्ष असला तरी त्याला आंतराष्ट्रीय राजकारणाचे अनेक कंगोरेही आहेत......
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे.
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं लव जिहादच्या विरोधात एक अध्यादेश आणलाय. त्यात लव जिहाद असा उल्लेख नसला तरी जबरदस्तीनं धर्मांतर करणं आता गुन्हा ठरेल. १ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूदही त्यासाठी करण्यात आलीय. अनेक भाजपशासित राज्यांनीही असा कायदा करायची घोषणा केलीय. हा कायदा मुस्लिमांना हिटलिस्टवर घेऊन करण्यात आलाय. पण तो केवळ मुस्लिमांच्याच नाही तर हिंदू महिलांसोबतच थेट संविधानाच्या विरोधात आहे......
मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय.
मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय......
भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत.
भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी मराठी साहित्यातला माईलस्टोन ठरली. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ घेण्यात आली होती. ‘हिंदू’तल्या पात्रांवर एक वेगळी कादंबरी लिहायची असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. या स्पर्धेत एकमेव बक्षिस मिळालं ते अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतलं पान’ या नव्याकोऱ्या कादंबरीला. त्यांची ही कादंबरी मॅजेस्टिककडून लवकरच बाजारात येणार आहे. त्यापूर्वी त्यातला एक भाग इथं देत आहोत......
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख मुद्दामून देत आहोत.
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख मुद्दामून देत आहोत......
आज गोकुळातल्या कृष्णाचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी. कृष्णाकडे आपण एक ईश्वरी अवतार या टिपिकल नजरेतून बघतो. पण डॉ. सदानंद मोरे यांनी श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र लिहिलंय. इंग्रजीतल्या या चरित्राचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने प्रकाशित झालाय. पूर्णिमा लिखिते यांनी हा अनुवाद केलाय. मनोविकास प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश.
आज गोकुळातल्या कृष्णाचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी. कृष्णाकडे आपण एक ईश्वरी अवतार या टिपिकल नजरेतून बघतो. पण डॉ. सदानंद मोरे यांनी श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र लिहिलंय. इंग्रजीतल्या या चरित्राचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने प्रकाशित झालाय. पूर्णिमा लिखिते यांनी हा अनुवाद केलाय. मनोविकास प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश......
महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती.
महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती......
राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा.
राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा......
६ डिसेंबर १९९२ या दिवसानंतर देशाचं राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही बदललं. त्या दिवशीची अयोध्या चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी अनुभवलीय. त्यांचा रिपोर्ट असलेला २१ डिसेंबरचा चित्रलेखाचा अंक ब्लॅकने विकला गेला. त्यातला हा ऐतिहासिक रिपोर्ट.
६ डिसेंबर १९९२ या दिवसानंतर देशाचं राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही बदललं. त्या दिवशीची अयोध्या चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी अनुभवलीय. त्यांचा रिपोर्ट असलेला २१ डिसेंबरचा चित्रलेखाचा अंक ब्लॅकने विकला गेला. त्यातला हा ऐतिहासिक रिपोर्ट......
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. सुप्रीम कोर्टात मंदीराच्या बाजुने निकाल लागलाय. त्या निर्णायचं स्वागत आहेच. पण त्यासोबत प्राध्यापक फैझान मुस्तफा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरच्या वीडियोत सांगितलेल्या तथ्यांकडेही लक्षं द्यायला हवं.
अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. सुप्रीम कोर्टात मंदीराच्या बाजुने निकाल लागलाय. त्या निर्णायचं स्वागत आहेच. पण त्यासोबत प्राध्यापक फैझान मुस्तफा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरच्या वीडियोत सांगितलेल्या तथ्यांकडेही लक्षं द्यायला हवं......
मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील.
मतला म्हणजे गझलेच्या सुरवातीचं धृवपद आणि मक्ता म्हणजे गझलेच्या शेवटी येणारी शायराची नाममुद्रा. स्वातंत्र्य ही गझल असेल तर लोकमान्य टिळक हे तिचा मतला आहेत आणि महात्मा गांधी मक्ता. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा याचं सूत्र या एका वाक्यात सांगितलंय. त्यामुळे दोघांपैकी एकचहवं असेल, तर गझल अर्धवटच राहील......
सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्व धर्म परिषदेत भाषण केलं आणि जग जिंकलं. त्यानंतर नऊ वर्षांनीच ४ जुलै १९०२ ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी दुसऱ्या दिवशी छापून आली नाही. त्यांचं डेथ सर्टिफिकेट उपलब्ध नाही. हे सारं बुचकळ्यात पाडणारं आहे.
सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्व धर्म परिषदेत भाषण केलं आणि जग जिंकलं. त्यानंतर नऊ वर्षांनीच ४ जुलै १९०२ ला त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी दुसऱ्या दिवशी छापून आली नाही. त्यांचं डेथ सर्टिफिकेट उपलब्ध नाही. हे सारं बुचकळ्यात पाडणारं आहे......
असूर ही वेबसिरिज सध्या खूप गाजतेय. खुनांची मालिका आणि त्यामागचं गुढ हे या सिरिजच्या केंद्रस्थानी असलं तरी त्याला जोडलेल्या भारतीय पौराणिक कथांच्या संदर्भामुळे ही सिरिज वेगळी ठरलीय. वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी नातं सांगणारी ही वेबसिरिज अंगाचा थरकापही उडवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडते.
असूर ही वेबसिरिज सध्या खूप गाजतेय. खुनांची मालिका आणि त्यामागचं गुढ हे या सिरिजच्या केंद्रस्थानी असलं तरी त्याला जोडलेल्या भारतीय पौराणिक कथांच्या संदर्भामुळे ही सिरिज वेगळी ठरलीय. वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी नातं सांगणारी ही वेबसिरिज अंगाचा थरकापही उडवते आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडते......
आज रामनवमी. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची प्रेमभावाने आठवण काढण्याचा दिवस. त्याकडे फक्त भक्तीच्याच अंगाने बघायला हवं, असं नाही. रामाच्या चरित्राकडे भारतीय इतिहासातल्या एका महान सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टीनेही पाहता येतं. हा संघर्ष नेमका आहे तरी कोणता?
आज रामनवमी. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राची प्रेमभावाने आठवण काढण्याचा दिवस. त्याकडे फक्त भक्तीच्याच अंगाने बघायला हवं, असं नाही. रामाच्या चरित्राकडे भारतीय इतिहासातल्या एका महान सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टीनेही पाहता येतं. हा संघर्ष नेमका आहे तरी कोणता? .....
आमच्या धर्माच्या चालीरीती अवलंबून आपण कोरोनाचा नायनाट करू शकतो, अशा पोस्ट लिहिणाऱ्यांचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. दुसरीकडे विरोधात लिहिणारे लोक, आता तुमचा देव मदतीला का येत नाही, असा सवाल करताहेत. पण दोघांच्याही दाव्यात काहीच तथ्य नाही. कारण धर्माचा आणि कोरोनाचा काहीएक संबंध नाही, असं सांगताहेत आघाडीचे तरुण कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर.
आमच्या धर्माच्या चालीरीती अवलंबून आपण कोरोनाचा नायनाट करू शकतो, अशा पोस्ट लिहिणाऱ्यांचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. दुसरीकडे विरोधात लिहिणारे लोक, आता तुमचा देव मदतीला का येत नाही, असा सवाल करताहेत. पण दोघांच्याही दाव्यात काहीच तथ्य नाही. कारण धर्माचा आणि कोरोनाचा काहीएक संबंध नाही, असं सांगताहेत आघाडीचे तरुण कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर......
सध्या भारत एकाचवेळी तीन संकटांशी दोन हात करतोय. अर्थव्यवस्थेची अवस्था आधीच बिकट असताना कोरोना वायरस आणि धार्मिक हिंसेचं नवं संकट आलंय. अशावेळी एकमेकांवर आरोप करून काहीही उपयोग होणार नाही. सरकारने ठोस पावलं उचलायला हवीत, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला सुनावलंय. तसंच सरकारला त्रिसुत्रीही सांगितलीय.
सध्या भारत एकाचवेळी तीन संकटांशी दोन हात करतोय. अर्थव्यवस्थेची अवस्था आधीच बिकट असताना कोरोना वायरस आणि धार्मिक हिंसेचं नवं संकट आलंय. अशावेळी एकमेकांवर आरोप करून काहीही उपयोग होणार नाही. सरकारने ठोस पावलं उचलायला हवीत, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला सुनावलंय. तसंच सरकारला त्रिसुत्रीही सांगितलीय......
आज महाशिवरात्री. म्हणजे शिवभक्तांचा सण. महादेवाला आपण देवांचा देव म्हणतो. कारण समुद्र मंथनातलं विष पिऊन महादेव निळकंठ झाला. समाजातलं विष पिणारे महात्मा गांधीही आधुनिक काळातले निळकंठच आहेत. महादेव बुद्धाचीही आठवण करून देतो. चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्यालाही महादेवाप्रमाणे ‘गंगाधारी’ आणि ‘आशुतोष’ व्हावं लागेल!
आज महाशिवरात्री. म्हणजे शिवभक्तांचा सण. महादेवाला आपण देवांचा देव म्हणतो. कारण समुद्र मंथनातलं विष पिऊन महादेव निळकंठ झाला. समाजातलं विष पिणारे महात्मा गांधीही आधुनिक काळातले निळकंठच आहेत. महादेव बुद्धाचीही आठवण करून देतो. चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्यालाही महादेवाप्रमाणे ‘गंगाधारी’ आणि ‘आशुतोष’ व्हावं लागेल!.....
शिवभक्तांचा महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. खरंतर शिवरात्री दर महिन्याला येते पण फक्त माघ महिन्यातल्या शिवरात्रीला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. या दिवशी भाविक उपवास करतात, जागरण करतात. या सणाची थोडक्यात माहिती देणारा मराठी विश्वकोशाच्या वेबसाईटवर आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या नोंदीचा हा संपादित भाग.
शिवभक्तांचा महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. खरंतर शिवरात्री दर महिन्याला येते पण फक्त माघ महिन्यातल्या शिवरात्रीला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. या दिवशी भाविक उपवास करतात, जागरण करतात. या सणाची थोडक्यात माहिती देणारा मराठी विश्वकोशाच्या वेबसाईटवर आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या नोंदीचा हा संपादित भाग......
भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात.
भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात. .....
शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल.
शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल......
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल.
भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल......
सीएए आणि एनआरसी म्हणजे देशाच्या एकसंघतेवर आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय. हिंदु-मुस्लिमांत फुट पाडण्याचं काम हा कायदा करतोय आणि म्हणून या कायद्याविरोधात आंदोलक आंदोलनं करतायत. या आंदोलकांची नेमकी भूमिका काय आहे याविषयीचा हा लेख.
सीएए आणि एनआरसी म्हणजे देशाच्या एकसंघतेवर आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय. हिंदु-मुस्लिमांत फुट पाडण्याचं काम हा कायदा करतोय आणि म्हणून या कायद्याविरोधात आंदोलक आंदोलनं करतायत. या आंदोलकांची नेमकी भूमिका काय आहे याविषयीचा हा लेख. .....
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका लेखाने खळबळ उडालीय. ‘द हिंदू’मधे आलेल्या लेखात डॉ. सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचा इशारा देत सरकारला खडे बोल सुनावलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षानेही आर्थिक मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी देशभरात मोर्चे, आंदोलनांचं नियोजन केलंय.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायच्या दिवशीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका लेखाने खळबळ उडालीय. ‘द हिंदू’मधे आलेल्या लेखात डॉ. सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचा इशारा देत सरकारला खडे बोल सुनावलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षानेही आर्थिक मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी देशभरात मोर्चे, आंदोलनांचं नियोजन केलंय......
काश्मीर प्रश्नावर युरोपियन युनियनने भारताची साथ दिली, अशी बातमी हिंदी भाषेतल्या हिंदुस्तान या पेपरनं छापली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त शब्दांचा खेळ केलाय. हिंदी मीडिया अशाच प्रकारे शब्द, तथ्य गाळून टाकण्याचा, त्याचे वेगळे अर्थ काढण्याचा खेळ गेली अनेक दशकं करतंय, असा आरोप पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे केलाय.
काश्मीर प्रश्नावर युरोपियन युनियनने भारताची साथ दिली, अशी बातमी हिंदी भाषेतल्या हिंदुस्तान या पेपरनं छापली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त शब्दांचा खेळ केलाय. हिंदी मीडिया अशाच प्रकारे शब्द, तथ्य गाळून टाकण्याचा, त्याचे वेगळे अर्थ काढण्याचा खेळ गेली अनेक दशकं करतंय, असा आरोप पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे केलाय......
सध्या हिंदू, हिंदूत्वाची चर्चा जोरात सुरू आहे. प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्या चष्म्यातून बघितलं जातंय. अशातच ‘हिंदू धर्म नेमका कसा आहे?’ या विषयावर ‘ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेनं एक चर्चासत्र घेतलं. मुंबई युनिवर्सिटीत झालेल्या या चर्चासत्रात हिंदू धर्माच्या विविधांगी पैलूंवर चर्चा झाली. या कार्यक्रमाचा हा लेखाजोखा.
सध्या हिंदू, हिंदूत्वाची चर्चा जोरात सुरू आहे. प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्या चष्म्यातून बघितलं जातंय. अशातच ‘हिंदू धर्म नेमका कसा आहे?’ या विषयावर ‘ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेनं एक चर्चासत्र घेतलं. मुंबई युनिवर्सिटीत झालेल्या या चर्चासत्रात हिंदू धर्माच्या विविधांगी पैलूंवर चर्चा झाली. या कार्यक्रमाचा हा लेखाजोखा......
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला.
धि गोवा हिंदू असोसिएशन यंदा शताब्दी साजरी करतेय. नव्या पिढीला या संस्थेविषयी फारसं माहीत नसेल. पण या संस्थेने मराठी रंगभूमीला, विशेषतः संगीत रंगभूमीला नवी झळाळी दिली. दर्जेदार नाटकं दिली. नवे कलावंत, संगीतकार दिले. गोव्याबाहेर राहणाऱ्या गोव्यातला लोकांना एकत्र करता करता या संस्थेने मराठी रंगभूमीला आकार दिला......
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा.
हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याच्या कथा आपण वेळोवेळी ऐकतो. त्यावर प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतात. श्रद्धा असणारे आपली श्रद्धा व्यक्त करतात. देवांएवढ्याच प्रत्येक देवाच्याही आपापल्या कथा आहेत. प्रत्येक प्रदेशात हरेक देवाची वेगवेगळी कथा आहे. गणपतीच्या अशाच पाच कथा......
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केलं. तिच्या या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होतेय. शत्रू असला तरी मेल्यावर त्याच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, असं हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं. पण साध्वीने हे तत्त्वज्ञान आपल्या हिंदुत्ववादाला लागू नसल्याचं दाखवून दिलंय. साध्वीचा हिंदुत्ववाद आणि हिंदू समाज याबद्दलचं एक विश्लेषण......
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही.
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही. .....
गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय.
गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय......
स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट.
स्वामी विवेकानंद यांचं शिकागो धर्मपरिषदेतलं भाषण सुप्रसिद्ध आहे. पण भाषणापूर्वी काय घडलं होतं हे अनेकांना माहीत नाही. विवेकानंदांची ‘ही अमेरिका यात्रा म्हणजे एक विलक्षण साहस’ अशा शब्दांत नोबेल विजेते फ्रेंच कादंबरीकार रोमां रोलां यांनी या संपूर्ण काळाचा उल्लेख केलाय. विवेकानंदांच्या सव्वाशे वर्षांपुर्वीच्या या ‘अनप्लॅन्ड’ प्रवासाची ही गोष्ट......