गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही.
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही. .....
गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय.
गुढीपाडवा साजरा व्हायलाच हवा. पण गुढीपाडवा म्हणून. हिंदू नववर्ष असं मुळात काही असूच शकत नाही. वेगवेगळ्या भागातल्या आणि समाजातल्या हिंदूंची नवी वर्षं वेगवेगळी आहेत. सगळ्या हिंदूंचा नव्या वर्षाचा एकच एक दिवस असणंही शक्य नाही. या प्रत्येकाचं वेगळेपण टिकायला हवं. पण तेच तोडण्यासाठी सगळ्या हिंदूंवर एकच नवीन वर्षं लादलं जातंय. त्यासाठी शोभायात्रांमधून तरुणांवर गारुड केलं जातंय......