साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय.
साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा गजानन पडोळ दिग्दर्शित ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा थियेटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडतोय. राजकारणाचा आणि समाजजीवनाचा संबंध जवळून दाखवणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत आता ‘रौंदळ’चीही भर पडलीय. मराठी सिनेमांमधे असलेली ही सामाजिक-राजकीय घटकांबद्दलची जाणीव ‘रौंदळ’च्या निमित्ताने आणखी ठळक होऊ पाहतेय......
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे.
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे......