महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट......
नैतिक मूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्या माणसांचा नेता म्हणून अस्सल देशीपणाचं सत्त्व घेऊन ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते राजकारणात वेगळे ठरले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणं, हा या मातीचा खरा लौकिक आहे.
नैतिक मूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्या माणसांचा नेता म्हणून अस्सल देशीपणाचं सत्त्व घेऊन ते कायम उभे राहिले. त्यामुळेच ते राजकारणात वेगळे ठरले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणं, हा या मातीचा खरा लौकिक आहे......