'फेडरल रिझर्व’च्या बरोबरीने जगातल्या इतर देशांतल्या मध्यवर्ती बँकाही व्याजदर वाढवत सुटल्यात. भारतीय रिझर्व बँकही याला अपवाद नाही. अमेरिकी 'फेड’ने तर अगदी शून्यापासून साडेचारपर्यंत व्याजदर वाढवले. याचे परिणाम बँकांना भोगावे लागतील, अशी शंका व्यक्त केली जात होतीच त्यावर सिलिकॉन वॅली बँकने शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळेच, आपल्या रिझर्व बँकेने रेपोदर वाढवण्याचा सपाटा बंद करावा, अशी सूचना स्टेट बँकेनं केली.
'फेडरल रिझर्व’च्या बरोबरीने जगातल्या इतर देशांतल्या मध्यवर्ती बँकाही व्याजदर वाढवत सुटल्यात. भारतीय रिझर्व बँकही याला अपवाद नाही. अमेरिकी 'फेड’ने तर अगदी शून्यापासून साडेचारपर्यंत व्याजदर वाढवले. याचे परिणाम बँकांना भोगावे लागतील, अशी शंका व्यक्त केली जात होतीच त्यावर सिलिकॉन वॅली बँकने शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळेच, आपल्या रिझर्व बँकेने रेपोदर वाढवण्याचा सपाटा बंद करावा, अशी सूचना स्टेट बँकेनं केली......
सिलिकॉन वॅली बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने तातडीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे अमेरिकी बँकांच्या समभागांना मोठा आर्थिक फटका बसलाय. सिग्नेचर तसंच सिल्वर गेट या दोन बँकाही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. पण सरकारनं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही.
सिलिकॉन वॅली बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने तातडीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे अमेरिकी बँकांच्या समभागांना मोठा आर्थिक फटका बसलाय. सिग्नेचर तसंच सिल्वर गेट या दोन बँकाही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. पण सरकारनं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही......