कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल.
कोरोना वायरसच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालीय. पुढचं लक्ष्य लहान मुलं असतील असं म्हटलं जातंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे काही दिवे लावलेत त्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय मीडियानं घेतलीय. आपलं हसं झालंय. या लाटांनी अर्थव्यवस्थेलाही फटका दिलाय. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं तर पुढचे धोके समजून घेऊन तसं नियोजन करावं लागेल......
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत......
भारतात कोरोना वायरसचा एक नवा प्रकार आढळून आलाय. वायरसच्या जनुकीय रचनेत दोन प्रकारचे बदल आढळून आलेत. यालाच डबल म्युटेशन म्हटलं जातंय. ४ एप्रिलला कोरोना पेशंटच्या आकडेवारीने अचानक लाखभराचा आकडा गाठला. त्यामागे हा डबल म्युटेशन वायरस असल्याचा अंदाज बांधला जातोय. वायरसमधल्या या नव्या बदलामुळे सगळ्यांची काळजी मात्र वाढलीय.
भारतात कोरोना वायरसचा एक नवा प्रकार आढळून आलाय. वायरसच्या जनुकीय रचनेत दोन प्रकारचे बदल आढळून आलेत. यालाच डबल म्युटेशन म्हटलं जातंय. ४ एप्रिलला कोरोना पेशंटच्या आकडेवारीने अचानक लाखभराचा आकडा गाठला. त्यामागे हा डबल म्युटेशन वायरस असल्याचा अंदाज बांधला जातोय. वायरसमधल्या या नव्या बदलामुळे सगळ्यांची काळजी मात्र वाढलीय......
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे.
कोरोना वायरसच्या सुरवातीच्या काळात आपली प्रयोगशाळा, हॉस्पिटल सुसज्ज करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लॉकडाऊन महत्त्वाचं होतं. ते पुन्हा लागू करणं योग्य नाही. स्वतःवर काही आवश्यक बंधनं घालून घेतली तर लॉकडाऊन न करताही आपल्याला कोरोनाचा बंदोबस्त करता येईल. आता तर आपल्या मदतीला लसही आलीय. कोरोनासोबत जगायला शिकणं आता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे......