आमच्याविषयी

कोलाज डॉट इन काय आहे?

कोलाज ही एक फिचर वेबसाईट आहे. यात मराठीत लिहिलेले लेख असणार आहेत. बातम्यांच्या पलीकडे जाऊन माहिती आणि विश्लेषण असेल. शिवाय यात वीडियोही असतील. फिचरोत्सवात तुमचं स्वागत आहे, या लेखात साईटची भूमिका वाचता येईल.

लेखांचे विषय कोणते असतील?

फक्त राजकारण किंवा फक्त साहित्य असे एकाच विषयाभोवती फिरणारे लेख यात नसतील. यात तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित कोणताही विषय येऊ शकतो. कोणत्याही एका विचारधारेचा, पक्षाचा यावर प्रभाव नसेल. मतभेदांच्या पलीकडे जाऊन निकोप विचारचर्चेचं इथे स्वागत आहे.

कोणाची आहे ही वेबसाईट?

सचिन परब कोलाजचे संपादक आहेत. ते दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. इंटरनेट, टीवी आणि प्रिंट या पत्रकारितेच्या तिन्ही प्रकारात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. अनेक प्रयोग केलेत. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने ते रिंगण हा अंक काढतात. पण ही त्यांच्या एकट्याची साईट नाही. हे कुणा एकट्याचं स्वप्न नाही. मीडिया आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातल्या काही तरुण मित्रांनी हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलंय.

याचे डेवलपर कोण?

विनायक पाचलग यांच्या वेदबिझ या कंपनीने ही साईट उभारलीय. विनायक आयटी विषयातले आहेत. तसंच टेक्नॉलॉजी आणि समाजाच्या परस्परप्रभावाचे अभ्यासक आणि लेखकही आहेत.