संपूर्ण लेख

ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे युवा शक्तीचा डंका

कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते.
संपूर्ण लेख

ग्रँड स्लॅम स्पर्धा: टेनिस खेळाडूंच्या संयमाची गुरुकिल्ली

ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे अव्वल दर्जाचं यश मिळवण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही, हे ‘जोकोविच’, ‘राफेल नदाल’ यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसून येतं. टेनिसच्या द‍ृष्टीने प्रौढत्वाकडे झुकलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतकं चापल्य नसेल. पण पराभवाच्या छायेतून मॅचला कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असं यश कसं खेचून आणायचं, हे या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे.
संपूर्ण लेख

टेनिसप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या विम्बल्डन सेंटर कोर्टची शताब्दी

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील.
संपूर्ण लेख

टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतली तरुणाई

डॅनियल मेदवेदेव आणि एम्मा रॅडूकानू यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं अजिंक्यपद मिळवताना बुजुर्ग आणि प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रँड स्लॅममधे खर्‍या अर्थाने युवाशक्तीचाच विजय झाला आहे. टेनिस क्षेत्रासाठी हा स्वागतार्ह बदल आहे.