संपूर्ण लेख

सत्ताधारी-विरोधकांचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीची गोष्ट

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यातल्या विधानसभेचा बिगुल वाजवलाय. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना मतदारांना हक्‍क बजावावा लागणार आहे. कोरोनामुळे डिजिटल प्रचाराचा आधार पक्षांना घ्यावा लागेल. या निकालातून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीचं संभाव्य चित्र तयार होणार आहे.
संपूर्ण लेख

निवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न आभासी दुनियेतली लोकशाही

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी केवळ वर्च्युअल प्रचार मोहिमा राबवायला परवानगी देण्यात आली. पण ज्या प्रकारे संसर्ग पसरतोय ते पाहता, संपूर्ण निवडणूकच वर्च्युअल मोडवर होईल, असं दिसतं. पाश्‍चात्त्य देशांमधे निवडणुकांमधे सोशल मीडियाचा आधार पूर्णपणे घेतला जातो. पण पूर्णपणे वर्च्युअल प्रचार मोहीम कुठेही चालवली जात नाही.
संपूर्ण लेख

गोवा विधानसभेची लगीनघाई, कुणाच्या हाती सत्तेची चावी?

गोव्याचा राजकीय अवकाश भौगोलिक अर्थाने छोटा असला, तरी गुंतागुंतीचा आहे. हा अवकाश व्यापण्यासाठी स्थानिक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोपशी तृणमूल काँग्रेसने युती केलीय. त्यामुळे मगोपला ‘विटॅमिन एम’ टॉनिक मिळालं आहे. त्यांच्या छावणीत आम आदमी पक्षही आहे. या एकवटलेल्या विरोधकांचं आव्हान भाजप कसं पेलतो, हे पहावं लागेल.
संपूर्ण लेख

प्रियांका गांधींची रणनीती काँग्रेसला उत्तर प्रदेशात बळ देईल?

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्‍या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.
संपूर्ण लेख

प्रियांका गांधींच्या रूपाने उत्तरप्रदेशात काँग्रेसचा शेवटचा डाव?

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल.
संपूर्ण लेख

मित्रपक्षांमुळे पुद्दूचेरीत भाजपला संधी मिळतेय?

विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना केंद्रशासित प्रदेश पुद्दूचेरीतलं काँग्रेसचं सरकार गडगडलं. येत्या ६ एप्रिलला विधानसभेच्या ३० जागांसाठी तिथं मतदान होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या सभेमुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरतेय. तर मित्रपक्षांमुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढलाय.
संपूर्ण लेख

तमिळनाडूच्या नेतृत्व पोकळीतली निवडणूक कोण जिंकणार?

द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय.
lock
संपूर्ण लेख

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं ऐतिहासिक महाभारत

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या प्रकारचं महाभारत बघायला मिळतंय. कौरव, पांडवांमधे सत्तेवरून भांडणं झाली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. आणि नंतर महाशिवआघाडीची चर्चा जोर धरू लागली. काय आहे हे महाभारत?
lock
संपूर्ण लेख

भीम परतून आल्यासारखं वाटतंय!

वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार?