गौतमी पाटीलवर बंदी घालाल, पण शिट्ट्या वाजवणाऱ्यांचं काय कराल?

गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय. तिचं नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परंपरा धोक्यात येतेय असं सांगून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडण्याचा इशारा दिलाय. मुळातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जातेय.

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्याबद्दल सध्या खुपच ओरडा-ओरड चालू आहे. विशेष म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अधिवेशनात मुद्दा मांडण्याचा तिला इशारा दिलाय. ‘महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारं नाही!’ असंही ते म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालतेय. तिचं नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. मुंग्यांचं वारूळ फुटल्यासारखं लोक तिचं नृत्य पाहण्यासाठी गर्दी करतायत. तिचं नृत्य पाहताना लोक वेड्यासारखे नाचतात, सगळा कार्यक्रम डोक्यावर घेतात. शिट्टया, टाळ्या आणि हळ्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो.

गौतमी पाटीलचं हे खुप मोठं यश आहे. तिच्यासाठी लोक वेडावलेत. तिच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका काहींनी घेतलाय असं दिसून येतं. त्यातूनच तिच्यावर बंदी घाला अशी कोल्हेकुई सुरू झालीय. कला क्षेत्रातल्या प्रस्थापितांना गौतमीची भिती वाटू लागली आहे. अनेकांनी गौतमीचा धसका घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जात आहे. संस्कृतीच्या आडाला दडत गौतमीला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुराणातली अख्यायिका काय सांगते?

पुराणात देवांचा राजा असलेल्या इंद्राची आणि अहिल्येची एक कथा आहे. गौतम ऋषीची पत्नी असलेल्या अहिल्येवर इंद्राचं मन जातं, ती त्याला आवडते. एकदा गौतम ऋषी अंघोळीला जातात आणि इकडे देवांचा राजा असलेला इंद्र गौतम ऋषींचा वेश धारण करतो. त्यांच्या आश्रमात अहिल्येकडे येतो. तिच्याशी संभोग करतो. तेवढ्यात अंघोळ आटपून गौतम ऋषी आश्रमात येतात आणि पाहतात तर इंद्र आपल्या पत्नीशी संभोग करत असल्याचंत्यांना दिसतं, ते संतापतात आणि अहिल्येला आणि इंद्राला शाप देतात.

गौतम ऋषीच्या शापाने अहिल्येची शिळा होते. पुढे राम अवतारात रामाच्या पदस्पर्शाने ती मुळ स्वरूपात आली म्हणे. काशी केली इंद्राने पण समाजात बदनाम झाली अहिल्याची. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या बदनाम झाली. तिला नवरा सोडून दगड व्हावं लागलं. इकडे इंद्र महाशय बिनबोभाटपणे देवांचा राजा म्हणूनच वावरत होते, मिरवत होते. त्यांना काही फरक पडला नाही. बाकी त्यांच्या बुडाला भगं पडली म्हणे.

पुराणात अशी अख्यायिका सांगितली आहे. यातून एकच सांगायचं आहे की समाजाची मानसिकता आजही यापेक्षा वेगळी नाही. अशा प्रत्येक प्रकरणात फक्त स्त्रीलाच जबाबदार धरलं जातं. तिच्यावरच सगळं बिल फाडलं जातं. इंद्राच्या प्रवृत्तीची पुरूष जमात मोकाट सोडली जाते. त्यांना काही बोललं जात नाही. त्यांनी काही करावं, कसंही वागावं ते क्षम्य असतं. त्यांचं काहीच वाकडं होत नाही.

हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

सामाजिक अपेक्षांचं ओझं बाईवर

स्त्रीला लगेच धारेवर धरलं जातं, तिला नितिमत्तेच्या, संस्कृतीच्या फुटपट्ट्या लावल्या जातात. तिला दुषणं दिली जातात. तिची मापं काढली जातात. हा दुटप्पीपणा इथल्या तथाकथित संस्कृती आणि धर्मातूनच झिरपत खाली आला आहे. इथली अनेक पुराण तपासली, चाळली तर हे सगळे प्रकार समोर येतील.

काळ बदलला तरी पुरूषी प्रवृत्ती बदलली नाही. ते आजही संस्कृतीच्या नावाखाली स्त्रीचं स्वातंत्र्य, स्त्रीचाच आवाज दाबताना दिसतात. तिच्यावरच सामाजिक अपेक्षांचं ओझं टाकताना दिसतात.

गौतमी पाटीलला ज्या अजित पवारांनी दम दिला त्याच अजित पवारांनी त्यांचा लाडका नेता धनंजय मुंडेंना का पाठीशी घातलं? धनंजय मुंडे त्यांना चालतात? त्यांना त्यांची करूणा येते त्यांची शौर्यगाथा चालते? मग गौतमी पाटीलच्या नृत्यांनंच तुमची संस्कृती बिघडते का? संस्कृतीच्या गप्पा मारणा-या अजित पवारांचा पक्ष गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवतोच कसा? याचं उत्तर देतील का अजितराव?

अजित पवारांची व्यक्तीपरत्वे भूमिका?

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला विरोध करत कानफाडी मारण्याची भाषा केली तेव्हा अजित पवारांचा बराच गोतावळा उर्फी जावेदला पाठबळ देताना दिसत होता. तिला पाठींबा देताना ते पुरोगामीत्व होतं का? मग आता गौतमीला विरोध करताना प्रतिगामी झालात काय? त्यावेळी अजित पवारांनी चित्रा वाघ यांना पाठींबा का दिला नाही? अजितरावांची व्यक्तीपरत्वे भूमिका बदलते की काय?

अजितरावांना संस्कृती रक्षणाचा प्रश्न पडला असेल तर त्याच संस्कृतीला फाट्यावर मारणारं मटेरियल सिनेमा सृष्टीत रोज चित्रीत होतं. इथल्या प्रस्थापित नायिका आणि नायक सगळ दाखवतात. सिनेमात दाखवायचं काहीच बाकी राहिलेलं नाही. टिवीवरच्या कंडोमच्या जाहिरातीत काय दाखवायचं बाकी राहिलंय? कुटूंबातले सगळे लोक त्या जाहिराती सहजपणे बघतात. ते कसलीही तक्रार करताना दिसत नाहीत.

आजवर यावर कुणी बोललंल नाही. कुठले संस्कृतीरक्षक ओरडलेले नाहीत, बंदीची मागणी केलेली नाही. अनेक सिरियलनीही हे टप्पे पार केलेत. मग याबद्दल आवाज बंद का? अनेक प्रस्थापित नट्या ज्या पध्दतीने पेहराव करतात, भूमिका करतात त्यावर अजितराव का कधी बोलले नाहीत?

हेही वाचा: पेशवाईच्या स्वैराचाराला ‘फटका’वणारा तमासगीर कीर्तनकार

चिकित्सक मनाला पडणारे प्रश्न

२००९ला अजितरावांच्या सरकारमधल्या एका मंत्र्याने एका अधिकारी महिलेचा हात पकडल्याची चर्चा होती. तो मंत्री अजितरावांच्या मांडीला मांडी लावून बसत होता. त्यावेळी त्याचा राजीनामा मागण्याची हिम्मत अजित पवारांनी का दाखवली नाही? एका अधिकारी महिलेवर अतिप्रसंग करणारा माणूस तुम्ही तुमच्या मंत्रीमंडळात सहन कसा केला? अजितराव हा प्रकार बसतो का महाराष्ट्राच्या परंपरेत?

२००९ चं कशाला नुकत्याच पायउतार झालेल्या महाआघाडी सरकारमधे भानगडवाला संजय राठोड अजितरावांना कसा काय चालला? तो आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या सरकारमधेही मंत्री आहे. तो किंवा धनंजय मुंडे मंत्री असण्यानं अजित रावांची संस्कृती अडचणीत येत नाही काय? गौतमी नाचली तरच संस्कृती धोक्यात येते की काय?

धनंजय मुंडे, संजय राठोड यांना अजित पवारांनी संस्कृतीचं व्याख्यान का झोडलं नाही ? त्यांना मंत्रीमंडळात घ्यायला का विरोध केला नाही? अजित पवारही चित्रा वाघ यांच्यासारखे दुटप्पी वागू लागले की काय? पक्षातल्या लोकांना एक न्याय आणि बाहेरच्या लोकांना दुसरा न्याय अशी चित्रा वाघ यांच्यासारखी भूमिका अजित पवारही घेवू लागलेत का?

अजित पवार चित्रा वाघांचा राष्ट्रवादी अवतार वाटू लागलेत. हा न्यायाचा दुजाभाव का? एक न्याय गौतमी पाटीलला आणि दुसरा न्याय इतरांना का? लोकशाही देशात न्यायातला दुजाभाव लोकशाही माणणा-या पक्षाच्या नेत्यांनी करावा हे विशेष आहे? हे प्रश्न चिकित्सक मनाला पडल्याशिवाय रहात नाही.

हा प्रश्नही अधिवेशनात मांडा

अजितराव, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी करणारे लोक गौतमीच्या घरचे नसतात. या गुडघ्यावर येणा-या झुंडीला काय सांगतील अजित पवार? त्यांचा काही दोष नाही काय? ते चुकीचे नाहीत का? की एकटी गौतमी पाटीलच अश्लील आहे? तिला पहायला गर्दी करणारे, शिट्ट्या वाजवणारे, वेडे होवून नाचणारे श्लील आणि सभ्य आहेत काय?

गौतमी सॉप्ट टार्गेट आहे म्हणून तिला तंबी देणार आणि भानगडी करणारे, महिलांचा हात पकडणारे मंत्री सरकारात घेणार? व्वा रे व्वा अजितराव. नृत्य करताना गौतमीनं मर्यादा ठेवायला हव्यात, भान ठेवायला हवं हे मान्य. पण भान सोडून तेच पहायला येणा-या लोकांचं काय? त्यांच्यासाठी अजितराव अधिवेशनात मुद्दा मांडणार का?

या राज्यातल्या लाखो माता-भगिणींचे संसार ज्या दारूने बरबाद झाले ती दारू संपुर्ण बंद करण्यासाठी अजितराव अधिवेशानात बोलणार का? महाराष्ट्राच्या संत परंपरेने दारूलाही नाकारलेलं आणि निषिध्द मानलं आहे. मग ती दारू बंद करण्यासाठी अजितराव पुढाकार घेणार का? अजितरावांना संस्कृतीचं पडले असेल तर त्यांनी यावरही विचार करावा. नसेल तर धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी चित्रा ताईंच्या सोबतीने सनातन समूह जॉईन करावा ही विनंती.

हेही वाचा:

प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

गिरीश कर्नाड: भारतीय कलासंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी

मी तुले सांगून ठेवतो, येणारा काळ मराठी गझलचाच आहे

लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

0 Shares:
You May Also Like
संपूर्ण लेख

आदिपुरुष : नव्या पिढीचं नवं रामायण

दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा नव्या पिढीला रामायण नव्याने सांगू पाहतोय. या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा कित्येकांनी…
संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

हरवलेल्या कथेच्या शोधात : साध्या शब्दांत उग्र वास्तव मांडणारा कथासंग्रह

लेखक सीताराम सावंत यांचा ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा नवा कथासंग्रह गावातलं समाजवास्तव नव्याने सांगू पाहतोय. रयत शिक्षण संस्थेत…
संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

करियर करणाऱ्या पोरींसाठी एग फ्रीजिंग ठरतंय वरदान

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमधे एग फ्रीजिंग केल्याचा खुलासा केला होता. सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी…
संपूर्ण लेख

‘फायर इन द माऊंटन्स’ : सरकारी आश्वासनांचा फसलेला रोडमॅप

सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच ‘फायर इन द माऊंटन्स’ हा नवा सिनेमा रिलीज झालाय. वरवर पाहता, या…