लॅटिन अमेरिका ही पर्यावरणपुरक जगासाठी नवी अर्थशक्ती

लॅटिन अमेरिकेत,  दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ३३ देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा असलेल्या तिसऱ्या नेपोलियनने १९ व्या शतकात दिले. अनेक शतकांपासून लॅटिन अमेरिकेने जगभरात लाखमोलांच्या वस्तू, खनिज पदार्थ पुरविल्या. आता आपण साधं चांदीचं उदाहरण घेऊ. अर्जेटिना हे नाव नाव चांदी या धातूवर आधारित आहे. चांदीला लॅटिन भाषेत अर्जेंटम म्हटले जाते.

ब्राझीलचे नावही या ठिकाणी आढळणाऱ्या ब्रिझलवूड झाडावरून पडलेले आहे. युरोपच्या व्यापार्‍यांनी १६ व्या शतकात या ठिकाणी ब्रिझलवूड झाडांची खूप कत्तल केली. नैसर्गिक साधनांसाठी झालेल्या आक्रमणांमुळे लॅटिन अमेरिकेत कधीच राजकीय स्थिरता राहिली नाही. या ठिकाणी सतत सत्तापालट, लोकप्रिय सरकार कोसळणे, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या समस्या इथल्या जगण्याचा भाग बनल्या.  मात्र त्यावर कधी ना कधी आळा बसेल, अशी शक्‍यता कायमच वर्तविली गेली आहे.

वाढत्या इलेक्र्टॉनिक गाड्या लॅटिन अमेरिकेला तारणार

जागतिक साठ्याच्या रूपातून लॅटिनच्या ३३ देशांवर सर्वांचीच नजर राहिलेली आहे. पॅरिसची स्वायत्त आणि सरकारअंतर्गत असणारी संघटना आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या मते, २०३० पर्यंत जगात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या एक हजार पटीच्या वेगाने वाढून ती २५० दशलक्ष होईल. लॅटिन देश चिलीच्या एसक्यूएम कंपनीसाठी ही खूपच महत्त्वाची बातमी आहे. कारण ही कंपनी जगातील प्रमुख लिथियम उत्पादक म्हणून ओळखली जाते. 

इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीसाठी लिथियम महत्त्वाचे आहे. अटाकामा वाळवंटात ही कंपनी मातीत असलेल्या नैसर्गिक द्रव्यातून लिथियम काढण्याचे काम करते. आजघडीला जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भर दिला जात आहे. या कारणांमुळेच ‘खनिजाला मागणी अचानक वाढली आहे. अशा खनिजांची फार मोठा साठा लॅटिन अमेरिकेत आहे.

उदाहरणार्थ साधारण वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना तांब्याची ४०० पट अधिक गरज भासते. या शतकाच्या प्रारंभी चीनमध्ये उद्योगधंदे वाढल्यामुळे पोलाद आणि तेलाला प्रचंड मागणी वाढली. मात्र काही वर्षांतच त्यात घट होऊ लागली. दुसरीकडे धातू आणि खनिजाला प्रत्येक देशात मागणी राहणार असून ती अधिक शाश्‍वत आहे.

स्वस्त हरित ऊर्जा पुरवू शकण्याचं सामर्थ्य 

एस अँडपी ग्लोबलमार्केट इंटेलिजन्सने २०२२ मध्ये एक अंदाज व्यक्‍त केला. त्यानुसार २०३५ पर्यंत जगभरातील तांब्याची मागणी २५ दशलक्ष टनांवरून दुप्पट होत ५० दशलक्ष टनावर पोचेल. लॅटिन अमेरिकेच्या बहुतांश देशांना मिळणारा महसूल हा निर्यातीतून मिळतो. त्याचे प्रमाणही सुमारे ८० टक्‍के आहे. लँटिन अमेरिकेकडे जगातील निम्मे लिथियम, ३५ टक्के तांबे आणि चांदी तसेच ग्राफाईट, टिन, निकेल याचा विपुल साठा आहे. 

चीन आणि भारतात मात्र उत्खनन करत लिथियम काढणे खूपच किचकट आणि खर्चिक आहे. त्यपेक्षा चिलीमध्ये लिथियमसारखा महत्त्वाचा धातू वाळूच्या बाष्पीभवनातून बाहेर काढला जातो. ही प्रक्रिया खूप सोपी आहे.  ब्राझीलमध्ये चुंबकीय तत्त्व असलेला दुर्मीळ वालुकामय धातू पृष्ठभागावर सहजपणे सापडतो. ब्राझील आणि चिलीसारख्या देशात स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे.

लॅटिन अमेरिका सौदीला टक्कर देऊ शकते

२०३० पर्यंत स्वस्तात हायड्रोजन उत्पादन करण्यासाठी चिली सध्या दिवस-रात्र मेहनत करत आहे. यातही सोन्याहून पिवळी बाब म्हणजे या भागात तेलाचा मोठा साठा सापडला आहे. एका अंदाजानुसार हा साठा ७० अब्ज बॅरलपेक्षा मोठा मानला जात आहे. २०३० पर्यंत अर्जेटिना, ब्राझील, मेक्सिको हे एकत्र आल्यास ते ११ दशलक्ष बॅरल तेल उत्पादित करू शकतात. याप्रमाणे ते सौदीशी मुकाबला करू शकतील. 

सध्या सोदीत रोज १२ दशलक्ष बॅरलचे उत्पादन होते. सौदी अजूनही जगातील दुसरा मोठा तेल उत्पादक आहे. आता आहाराचा विचार केल्यास २०४० पर्यंत जगातील लोकसंख्या ९.१ अब्ज होऊ शकते. या हिशेबाने खाद्यपदार्थाची मागणीही वाढेल. संयुक्‍त राष्ट्राच्या एका अंदाजानुसार, जगाची लोकसंख्या २०८० पर्यंत १० अब्ज ७० कोटी होईल जगातील एकूण सोयाबीनच्या निर्यातीत लॅटिन अमेरिकेचा वाटा ६० टक्के आहे. 

याशिवाय ते कुक्कुट, साखर, कॉफीसह अनेक गोष्टींची निर्यात करतात. यामागचे कारण म्हणजे कमी असणारी लोकसंख्या. चीन आणि भारताच्या तुलनेत लोकसंख्या कमी आहे आणि त्यामुळे शेतीसाठी मोठा भूभाग उपलब्ध आहे. म्हणून येत्या दहा वर्षांत या क्षेत्रातून खाद्यपदार्थांची निर्यात ही १०० अब्ज डॉलर पोहोचू शकते. 

जागतिक सत्तास्पर्धेचाही फायदा लॅटिन अमेरिकेला

लॅटिन अमेरिकेतील देश फायद्यात राहण्यामागे आणखी एक कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये असलेली स्पर्धा. परिणामी जग दोन गटांत विभागलेले आहे. गेल्या तीन वर्षांत पश्‍चिम देशांनी चीनमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. अशावेळी लॅटिन अमेरिकी देश हे अन्य देशांच्या तुलनेत अधिक तटस्थ आणि निष्पक्ष दिसतात. म्हणूनच पश्चिमी देश आणि चीनया क्षेत्रातून माल मागविण्यासाठी रुची दाखवत आहेत. 

याचा परिपाक म्हणजे मेक्सिकोने चीनऐवजी अमेरिकेला सर्वात मोठा व्यापारी भागीदार करण्यास विलंब लावला नाही. मँकेन्जीच्या एका ताज्या अहवालात म्हटले आहे की, लॅटिन अमेरिकी देशात ८० टक्के स्टार्टअप युनिकॉर्नचे लक्ष हे फिनटेक आणि ई-कॉमर्सवर केंद्रित आहे. तरीही या क्षेत्रात आठपट अधिक बौद्धिक संपत्ती आयात होते. 

अशावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने गगनभरारी घेतली तर लॅटिन अमेरिका सहजपणे अन्य क्षेत्राच्या तुलनेत मागे पडेल. अर्थात लॅटिन अमेरिकेच्या साम्राज्यातील लक्ष्मी या संपूर्ण भागावर प्रसन्न आहे. परंतु लॅटिन अमेरिकेतील ३३ देश यशस्वी ठरतील का, या संधीचा लाभ कसे उचलतात, यावर सर्व काही अवलंबून आहे.

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
amphibians endangered
संपूर्ण लेख

उभयचर नष्ट होताहेत, उरलेल्या जीवसृष्टीवरही धोक्याची घंटा!

जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान…
संपूर्ण लेख

‘लिव्ह इन’ की ‘लग्न’ यावर उत्तर कसं शोधणार?

‘लिव्ह इन’ अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधात राहण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या…
संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

फक्त ८० रुपयात ‘लिज्जत’ हा ब्रँड घडविणाऱ्या आज्जी गेल्या

ही गोष्ट आहे, १९५९ मधली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो भारावलेला काळ होता. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू देशाची नवी…
संपूर्ण लेख

सत्यशोधक पत्रकारितेचे विस्मृतीत गेलेले अतुलनीय योगदान

एकोणिसाव्या शतकातील नियतकालिके उच्चवर्णीय पांढरपेशा वर्गातील उच्चशिक्षितांनी सुरू केलेली होती. त्यांच्याच प्रश्नांची चर्चा आणि आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब नियतकालिकांतून पडलेले…
संपूर्ण लेख

मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवू नये

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. पण त्यात शांततेला कुठं धक्का लावला नाही. पण तोच मराठा बांधव…