कसा लावायचा बिहार निकालाचा अन्वयार्थ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांविषयीच्या नाराजीचा फटका भाजपला बसला नाही याचं कारण मोदी हेच आहेत. घोषित केल्याप्रमाणे नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण सरकारवर प्रभाव भाजपचाच असेल. दुसरीकडे बिहारच्या राजकारणावर पकड ठेवू शकेल असे नेतृत्वगुण तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत दाखवून दिलेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक ५७ टक्के मतदान झालं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार्यात या निवडणुकीत मतदारांचा असा प्रतिसाद दिसल्यामुळे ‘काँटे की टक्कर’ होईल असा अनुमान होता. आणि झालंही तसंच. शेवटच्या फेरीपर्यंत महाआघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आकडे खाली-वर होत राहिले. शेवटी एनडीए १२५ आणि महाआघाडी ११० असा निकाल लागला.

१२२ हा बहुमत देणारा आकडा आहे. त्यामुळे एनडीएला बहुमताच्यावर अवघ्या ३ जागा मिळाल्या. मतांची टक्केवारी पाहिल्यास किती कडवी टक्कर झाली हे लक्षात येतं. एनडीएला ३७.३ टक्के तर महाआघाडीला ३७.२ टक्के मतं मिळाली.

एमआयएमचं नवं अस्तित्व

आरजेडी ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष झाला तर भाजप ७४ जागांसह एनडीएमधला मोठा मित्रपक्ष झाला. भाजप-जेडीयुच्या आघाडीमधे पहिल्यांदाच भाजपला जेडीयुपेक्षा अधिक जागा मिळाल्यात. जेडीयुला ४३ जागा जिंकता आल्या. चिराग पासवान यांच्या एलजेपीची अवघ्या एका जागेवर बोळवण झाली आहे.

काँग्रेस १९ तर डावे पक्ष १६ जागांवर विजयी झाले. असाउद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने या निवडणुकीच्या निमित्ताने भविष्यात दुर्लक्ष करता येणार नाही, असं राजकीय अस्तित्व निर्माण केलंय. एमआयएमने पाच जागा मिळवल्यात.

हेही वाचा : कोणत्या दिशेने वाहतायत बिहार निवडणुकीचे वारे?

मतदारांचे फेरीनुसार बदलत गेलेले मत

या निवडणुकीत मतदानाच्या तीन फेर्यात झाल्या. पहिल्या फेरीत मतदारांचा कौल महाआघाडीच्या बाजूने गेला. या फेरीत महाआघाडीला ४८ तर एनडीएला अवघ्या २१ जागा मिळाल्या. दुसर्या  फेरीत एनडीएला ५२ तर महाआघाडीला ४२ मिळाल्या. तिसर्या  फेरीत मात्र चित्र पहिल्या फेरीच्या उलट झालं. या फेरीत एनडीएला ५२ तर महाआघाडीला  केवळ २१ जागा मिळाल्या.

पहिल्या फेरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा धडाक्यात घेतल्या. तेजस्वी यादव यांना ‘जंगलराज का युवराज’ म्हणत त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या काळातील आठवणी ताज्या केल्या. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन नितीशकुमारांनी शेवटच्या फेरीच्या वेळी केली. याचा सकारात्मक परिणाम झाला असं दिसतं.

महिलांची सायलंट वोट बँक

याशिवाय एक महत्त्वाचा बदल म्हणजे पहिल्या फेरीत पुरुषांनी केलेलं मतदान महिलांपेक्षा १ टक्के अधिक होतं. दुसर्याो आणि तिसर्याक फेरीत मात्र महिलांनी केलेलं मतदान पुरुषांपेक्षा अनुक्रमे ६ टक्के आणि ११ टक्के जास्त होतं. गेली १५ वर्ष नितीशकुमारांनी ‘महिलांची’ म्हणून वोट बँक निर्माण केलीय. महिलांसाठी कल्याणकारी योजना, शाळेत जाणार्याे मुलींसाठी सायकल असे कार्यक्रम त्यांनी राबवलेत. दारूबंदीचा निर्णयही त्यांनी महिलांना समोर ठेवून घेतला होता. त्याने दारू मिळणं थांबलं नसलं तरी बहुसंख्य महिलांनी अंमलबजावणीपेक्षा नितीशकुमारांच्या हेतूंवर विश्वास ठेवलाय, असं दिसतं.

त्याचबरोबर केंद्र सरकाराच्या उज्ज्वला सारख्या कल्याणकारी योजनांचाही सकारात्मक परिणाम झाला. महिलांचा असा प्रतिसाद मिळाला नसता तर एनडीए विजयी होणं अशक्य होतं.

हेही वाचा : आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

जातीय समीकरणं

जातीय समीकरणं बिहारच्या निवडणुकीत कळीची ठरतात. कथित उच्चजाती भाजपचा सामाजिक आधार आहे. नितीशकुमारांनी यादवेतर ओबीसी आणि महादलित असं समीकरण आपल्या मागे उभं केलं. यावेळी महादलितांमधे चलबिचल होती. मात्र, रविदास आणि पासवान या जाती वगळता दलितांनी एनडीएची साथ दिलेली दिसते. महागठबंधन सोडून आलेले जितनराम मांझी आणि मुकेश साहनी यांचा एनडीएमधील सहभागही लाभदायक ठरला.

महागठबंधनचा सामाजिक आधार मुस्लिम आणि यादव आहेत. एमआयएममुळे सीमांचल भागात महागठबंधनला फटका बसला. आपला सामाजिक आधार महागठबंधनला पूर्णतः टिकवता आला नाही. दुसरीकडे महादलितांमधे आपला पाया विस्तारता आला नाही. तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठी उपलब्धी हीच कीत्यांना रोजगार या मुद्द्यावर युवकांना आकर्षित करता आलं. त्यामुळेच शेवटपर्यंत ते स्पर्धेत राहू शकले.

चिराग पासवान यांचा नितीशकुमारांना फटका

चिराग पासवान यांनी जेडीयु तसेच एनडीएमधील इतर घटक पक्ष विकासशील इन्सान पार्टी म्हणजेच वीआयपी आणि हिंदुस्थान अवाम मोर्चा म्हणजेच हाम यांच्या सर्व उमेदवारांविरोधात एलजेपीचे उमेदवार उभे केले होते. एलजेपीने जरी जेडीयु विरोधातली एकच जागा जिंकली असली तरी एलजेपीमुळे तब्ब्ल ३२ जागांवर जेडीयुला फटका बसला. या जागांवर जितक्या मतांनी जेडीयुचा उमेदवार पराभूत झाला त्यापेक्षा अधिक मतं एलजेपीच्या उमेदवाराला मिळाली.

वीआयपी आणि हामला देखील प्रत्येकी ४ आणि ३ जागांवर एलजेपीचा फटका बसला. एलजेपीचे बरेच उमेदवार भाजपकडून आयात केले होते. भाजपला मानणारी वोट बँक या मतदारसंघामधे एलजेपीबरोबर गेल्याचं दिसतं.

चिराग पासवान यांना जेडीयुच्या विरोधात उभं करणं ही भाजपची शहानीती होती, असं म्हटलं जातं. यामागे एनडीएमधला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे यावा, असा हेतू होता. तो हेतू साध्य झालाय. २०१० मधे ११५, २०१५ मधे ७१ जागा असलेल्या जेडीयुची गच्छंती ४३ जागांवर झाली आहे. अमित शहा यांनी घोषित केल्याप्रमाणे नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील, पण सरकारवर प्रभाव भाजपचाच राहील हे निश्चित आहे.

हेही वाचा : उत्तर प्रदेश प्रकरणानंतर काँग्रेसला फुटेल का नवी पालवी?

नितीशकुमार विरोधी रोष

चिराग पासवान फॅक्टर बरोबर नितीशकुमार यांची मतदारांच्या मनोभूमीवरील सुटलेली पकड हे जेडीयुला बसलेल्या फटक्याचे दुसरं कारण आहे. नितीशकुमार यांच्या १५ वर्षांच्या राजवटी विरोधी भावना मतदारांमधे होती. दारूबंदी, जल योजनेमधील भ्रष्टाचार, लॉकडाऊन काळात झालेल्या हालअपेष्टा अशा विविध कारणांसाठी त्यांच्याविरोधात अशी भावना निर्माण झाली होती. त्यांच्या सभांमधे त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या होत्या.  एकहाती निवडणूक फिरवण्याची त्यांची क्षमता यावेळी अयशस्वी ठरली.

नितीशकुमार यांची सर्व अर्थाने ही शेवटची निवडणूक ठरेल. ते स्वतः सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे. जेडीयुमधे ते वगळता इतर कोणी सक्षम नेतृत्व नाही. त्यांच्या राजकीय कमजोरीचा थेट लाभार्थी भाजप आहे.

तेजस्वी यादव – मॅन ऑफ द मॅच

तेजस्वी यादव यांचा मर्यादित राजकीय अनुभव आणि लोकसभा निवडणुकीत उडालेला धुव्वा यामुळे राष्ट्रीय जनता दलाच्या म्हणजेच आरजेडीच्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली टिकाव लागेल का अशी चर्चा दोन महिन्यांपूर्वी केली जात होती. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडीला केवळ २२ जागा मिळाल्या होत्या. २०१५ मधे ८० मिळाल्या खर्याथ पण त्याचं श्रेय जेडीयुबरोबर केलेल्या आघाडीला दिलं जात होतं. त्यामुळे यावेळी लालूप्रसाद यादव उपस्थित नसताना आरजेडीला सर्वाधिक ७५ जागा मिळणं ही मोठी कामगिरी आहे.

आरजेडीमधे खर्याल अर्थाने लालूप्रसाद ते तेजस्वी यादव अशी खांदेपालट या निमित्ताने झालीय. यावेळी ३१ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची संधी त्यांनी थोडक्यात गमावली असली तरी भविष्यात ते या पदासाठीचे प्रबळ दावेदार असतील यात शंका नाही. त्यांच्या प्रचारसभांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. प्रचाराचे सूत्र ही त्यांनी शेवटपर्यंत आपल्या ताब्यात ठेवलं. रोजगार हाच मुद्दा त्यांनी केंद्रस्थानी ठेवला. १० लाख सरकारी नोकर्यात देण्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपलाही १९ लाख रोजगार संधी निर्माण करू, असं आश्वासन द्यावं लागलं होतं.

जेपी आंदोलनातील पिढीचं राजकारण शेवटाकडे चाललंय. भाजपकडे राज्य पातळीवर प्रभावी ठरेल असा नेता या क्षणाला नाही. चिराग पासवान यांच्याकडे उपद्रव क्षमता असली तरी त्यांच्या राजकारणाला मर्यादा आहेत. भविष्यात लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमारांप्रमाणे बिहारच्या राजकारणावर पकड ठेवू शकेल असे नेतृत्वगुण तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत दाखवून दिलेत.

हेही वाचा : कमला हॅरिसच्या विजयाचा भारतीयांना आनंद व्हायचं काहीही कारण नाही!

मोदींचा करिष्मा

कोरोनाचे गैर-व्यवस्थापन, बेरोजगारीचा उच्चांक, गर्तेत गेलेली अर्थव्यवस्था, चीनसंदर्भात झालेली नामुष्की अशा गोष्टी असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या निवडणुकीतला भाजपचा चेहरा मोदी हेच होते. विरोधकांची खिल्ली उडवणं आणि राष्ट्रीय मुद्दे हेच मोदींच्या प्रचाराचं सूत्र होतं. नितीशकुमारांविषयी असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसला नाही याचं कारण मोदी हेच आहेत. २०१५ मधे ५३ जागा असलेल्या भाजपला यावेळी ७४ जागा मिळाल्या.

भविष्यात बिहारमधे आरजेडी आणि भाजपमधेच मुख्य सामना होईल हे या निवडणुकीने स्पष्ट केलंय. ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची होती. शासकीय धोरणं फसली तरी मतदारांना भुलवण्याचा मंत्र भाजपला सापडलाय. तो या निवडणुकीत सिद्ध झालाय. हाच मंत्र आता आगामी निवडणुकांमधे विशेषतः पश्चिम बंगालमधे वापरला जाईल. बिहार हे हिंदी पट्ट्यातील एकमेव राज्य आहे जिथं भाजपला एकहाती प्रभाव टाकता आलेला नाही. जेडीयु कमजोर होत असताना, भविष्यात तो तसा निश्चित टाकता येईल हे या निवडणुकीने स्पष्ट केलंय.

बिहारबरोबर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधे झालेल्या पोटनिवडणुकांमधे भाजपने वर्चस्व राखले आहे. मध्य प्रदेशमधे २८ पैकी १६ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. परिणामी भाजपचं मध्य प्रदेशमधील सरकार स्थिर झालंय. आपल्या सरकार पाडण्याच्या प्रयोगाला लोकमान्यता मिळालीय, असा याचा अर्थ भाजपकडून लावला जातो. त्यामुळे आगामी काळात राजकारणाच्या मोदी-शहा नीतीला ब्रेक लागण्याची शक्यता नाही.

हेही वाचा : 

खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं?

अर्णब घाबरू नकोस, जेएनयू तुझ्या सोबत आहे!

आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

‘ओबामा’ नावाचा ‘सक्सेस पासवर्ड’ जगाला पुन्हा गवसतोय, तर!

0 Shares:
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Rajsthan Election 2023
संपूर्ण लेख

राजस्थानात भाजपमधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर?

राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा सरकार बनविण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे यावेळीही काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्या…
Toll issue in Maharashtra
संपूर्ण लेख

रस्त्यावरील ‘टोलचा झोल’ किती दिवस चालणार?

सामान्य जनतेला रस्ते असो वा कोणतीही सुविधा असो मोफत नको आहे. पण टोलवसुलीच्या नावे चाललेली जनतेची लूट लोकांना…
संपूर्ण लेख

प्रादेशिक पक्षांना गारवा देतोय कर्नाटकातल्या बंडखोरीच्या वणवा

कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल…
संपूर्ण लेख

Point by Point: खलिस्तानचं मॅटर आणि भारत-कॅनडा पंगा

कॅनडा आणि एकंदरीतच पाश्चिमात्य देशात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया आणि भारत आणि कॅनडा या दोन देशांतील ताणलेले…
संपूर्ण लेख

धनगर आरक्षणाच्या आंदोलनाआधी, फडणवीसांना जाब विचारा!

 मराठा आरक्षणाच्या जालन्यामधील लाठीमारापर्यंत गेलेल्या आंदोलनानंतर, ओबीसींनी आंदोलनाचा इशारा दिला. आता धनगरांना भडकवलं जातंय. हे नक्की कशासाठी चाललंय…
संपूर्ण लेख

भागवतांच्या पुरोगामी विधानांमागे दडलंय काय?

आरएसएस ही मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाची सत्ता २०१४ मधे आल्यानंतर वर्षभराच्या अंतरानं, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी…